पाऊस मेरसे रोदोरेदा ०३ मे २०२२
घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं ब…
संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट ज्ञानेश्वर जाधवर १५ मार्च २०२२
या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून …
‘अविनाशपासष्टी’ बाळासाहेब लबडे १५ मार्च २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा ६५ निवडक गझलांचा संग्रह त्यांच्या पासष्टीतील पदार्पणाचे औचित्य साधून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. इ.स.१९७९पासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून प्राचार्य डॉ. सांगोलेकर हे गझललेखन कर…
वास्तवाला भिडणार्‍या ‘वायर’च्या पत्रकार नीतीन ब्रह्मे १३ मार्च २०२२
या वर्षी १ जानेवारी २०२२ला सगळे जग नवीन वर्षाचे स्वागत करत असताना; ‘बुली बाई’ नावाच्या वेबसाईटवर भारतातील मुस्लीम महिलांचा लिलाव करण्यासाठी बोली लावली जात होती. सोशल मीडियावर असलेले मुस्लीम महिलांचे फोटो त्यासाठी अपलोड करण्यात आले होते. इस्मत आरा या मुलीचा फोटो त्या दिवशी ‘डिल ऑफ द डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. इस्मत आरा ही ‘द वायर’ची पत्रकार आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहिणी सिंगला सोशल …
विचार आणि कृतींचे नवे आयाम मिलिंद बोकील ०९ मार्च २०२१
विद्या बाळ आणि पुष्पा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात, विशेषत: स्त्रीवादी चळवळीच्या क्षेत्रात, एक प्रकारची पोकळी जाणवणे साहजिकच आहे. ह्या दोन्ही स्त्रियांनी आयुष्यभर स्त्रीवादी चळवळीची पाठराखण तर केलीच, पण महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. विवेकनिष्ठ तरीही लडिवाळ, विचारी आणि कृतिशील, वस्तुनिष्ठ असूनही समंजस आणि मर्मज्ञ तरीही र…
पर्यावरण संतुलन : खरं आव्हान बाजारपेठेचं आहे! अतुल देऊळगावकर १५ जून २०२०
कोरोना आणि जागतिक हवामान बदल या दोन्ही गोष्टी निसर्ग विनाशाच्या उत्पत्ती आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. दोन्हीच्या मुळाशी 'निसर्गाचा विनाश' हेच कारण आहे. हवामानबदलाचं कारण कार्बन उत्सर्जनात वाढ झाल्याने होणारी प्रदूषण वाढ हे आहे, पण प्रदूषणामुळे निसर्गावर विपरीत परिणाम आणि त्यातून तापमानवाढ अशी मूळ साखळी आहे. कोरोनाबाबत सध्या जगातले जे संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत ते काय सांगतायत? जंगलविनाश वेगात सुरू…
COVID-19 & Climate Change : Connections & Shared Concerns Prajakta Kolte ०५ जून २०२०
The speed and scope of the COVID-19 outbreak have taken governments all over the world by surprise and left the stock markets reeling. The pandemic has forced governments into a difficult balancing act between ensuring safety and wellbeing of people and maintaining profit margins and growth targets. Ultimately, the prospect of a large death toll and the collapse of health systems have forced count…
On Being Cooped Up: The Irony of Being Privileged Nagmani Rao ०२ जून २०२०
Some days ago, a friend, Anju, sent a video of hordes of hens and cocks racing out, as if celebrating their ‘azadi’ after heaven knows how many days of being ‘cooped up’. Her caption said it all – ‘Us after lockdown is lifted’. Never have I empathized more with the condition of cooped-up species than I do now…. And this, despite being in the care and company of loved ones. It makes me ponder….how …
कोरोनाचे चार शिकार रोहिणी भट-साहनी ०५ मे २०२०
चार? तुम्ही म्हणाल हजारो लाखो म्हणा. बरोबर आहे तुमचं म्हणणं! कोरोनाचे पेशंट्स हजारोंनी आहेत. एकट्या मुंबईत चार हजारच्या वर पेशंट झालेत. पण कोरोनाची ज्यांना लागण झाली नाहीये, कोरोनाचे जे पेशंट नाहीत तेही कोरोनाचे शिकार झालेत त्याचं काय? आपण कोरोनाचे पेशंट 'होऊ नये' म्हणून केलेल्या धडपडीमुळे, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे आपण सगळे जे झालो आहोत, तेही कोरोनाचे शिकारचं ना? आता उदाहरणार्थ अनिता आणि त…