या चैका! (महिला अंतराळयात्रींचा संघर्ष) सुकल्प कारंजेकर २८ मार्च २०२४

“मी सीगल बोलतेय. इकडे सगळं ठीक आहे. मला इथून खुलं क्षितिज दिसतं आहे: निळसर नितळ क्षितिजापलीकडे गडद अवकाशाचा खोल महासागर दिसतो आहे. तो मला खुणावतो आहे. इथून पृथ्वी खूप सुंदर दिसत आहे.” - व्हॅलेंटीना तेरेश्कोव्हा (पहिल्या महिला अंतराळयात्री) यांच्या उद्गाराचा स्वैर अनुवाद ऑक्टोबर २०१९मध्ये क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर या अंतराळयात्रींना एक महत्त्वाचं काम देण्यात आलं. पृथ्वीपासून सरासरी ४०…