वास्तवाला भिडणार्‍या ‘वायर’च्या पत्रकार नीतीन ब्रह्मे १३ मार्च २०२२
या वर्षी १ जानेवारी २०२२ला सगळे जग नवीन वर्षाचे स्वागत करत असताना; ‘बुली बाई’ नावाच्या वेबसाईटवर भारतातील मुस्लीम महिलांचा लिलाव करण्यासाठी बोली लावली जात होती. सोशल मीडियावर असलेले मुस्लीम महिलांचे फोटो त्यासाठी अपलोड करण्यात आले होते. इस्मत आरा या मुलीचा फोटो त्या दिवशी ‘डिल ऑफ द डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. इस्मत आरा ही ‘द वायर’ची पत्रकार आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहिणी सिंगला सोशल …
कमला : आमची रॉकस्टार संयोगिता ढमढेरे १२ मार्च २०२२
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधल्या खेड्यात १९४६ साली जन्मलेल्या कमला भसीन; स्वातंत्र्योत्तर भारतात पंजाबमध्ये १९६५ साली जन्मलेल्या शबनम वीरमाणी आणि आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात १९७६ साली जन्मलेल्या मोसमी परीयाल म्हणजेच आताच्या पार्वती बाउल. वय, अंतर व भाषा पाहता या तिघींचा एकमेकींशी संपर्क होण्याच्या शक्यताही कमी होती. तिथे या तिघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. गाणं हा या तिघींना जोडणारा …
जागृतीचा वसा घेतलेली प्रियांका मेघना अभ्यंकर १० ऑक्टोबर २०२१
आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री कधी ना कधीतरी लैंगिक अत्याचार, विनयभंग, छेडाछेडी, अश्लील टोमणे यांचा अनुभव घेतेच. आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाविरूद्ध तिने कधी आवाज उठवू पाहिला, तर समाजात तिला डोळे मोठ्ठे करून गप्प केलं जातं. अनेकदा लैंगिक अत्याचार करणारे त्या मुलीचे नातेवाईकच असतात...कधी लाजेपोटी, कधी भीड बाळगून तर कधी मान-सन्मानाच्या फालतू कल्पना उराशी बाळगून मुलीचे आई-वडीलच तिला “विसरून जा, …
निर्वासितांची माउली : मंगेशी मून मेघना अभ्यंकर ०९ ऑक्टोबर २०२१
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, आपल्याला भीक मागणारी मुलं दिसतात. त्यांचे दिनवाणे चेहरे, खपाटीला गेलेली पोटं, मळके कपडे आणि चेहऱ्यावरच्या त्या अगतिकतेला पाहून सहजच आपला हात खिशात जातो, बोटं नाणी चाचपडत एक-दोन रुपयांच्या नाण्यांच्या शोध घेतात, खिशातला हात बाहेर येतो आणि समोरच्या त्या भीक मागणाऱ्या पोराच्या चेहऱ्यावर आशेची लकेर दिसते... एक-दोन रुपये तरी पदरात पडले या आनंदात तो त्याचा डबा वाजवत तिथून …
उपेक्षितांची अन्नपूर्णा : उज्ज्वला बागवाडे मेघना अभ्यंकर ०८ ऑक्टोबर २०२१
सध्या टीव्हीवर ’आई कुठे काय करते’ ही मालिका चालू आहे त्यात आपल्या मुलाबाळांमध्ये, सासू-सासरा, नवरा, संसार यात रमलेल्या स्त्रीची वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठीची धडपड दाखवलेली आहे. मालिकेतील अशी लग्न झाल्यापासून आपली मुलं, परिवार, नातेसंबंध, नवरा यांच्यात गुंतून पडलेली आई, या ना त्या फरकाने आपण प्रत्येकाने आपल्या घरात पाहिली आहे. आपल्या आईने तिच्या आधी आपली काळजी करावी, आपल्…
फिरत्या चाकावरची जादूगार - चतुरा कुंभार मेघना अभ्यंकर ०७ ऑक्टोबर २०२१
“अनंत आमुची ध्येयासक्ती, अन् अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला...” कधीकाळी भाषणात म्हणलं होतं हे वाक्य... तेव्हा त्याचा अर्थ नीटसा कळला नव्हता. भाषणात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ओवी, उक्त्या, म्हणी, कवितांच्या ओळींपैकी हे एक वाक्य इतकचं; पण आज इतक्या वर्षांनी प्रकर्षाने ते वाक्य पुन्हा आठवावं आणि त्या वाक्याची प्रचिती यावी याला कारण ठरली मला भेटलेली - चतुरा कुंभार! सातारा शहरात कुरणेश्वर परि…
उसात गोडवा भरणाऱ्या शास्त्रज्ञ - डॉ. जानकी अम्मल तेजस्विनी देसाई २९ जुलै २०२१
समाजातील सर्वच स्तरांवर महिलांच्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा त्याची नोंदही केली जात नाही. शिक्षण - संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानकी अम्मल एडावलाथ कक्कट! खरं तर शिक्षण - संशोधन क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांवर सुवर्णाक्षरांनी हे नाव कोरायला हवं. पण आपण इतके करंटे की, संशोधनाच्या इतिहासातील मोजकीच पाने त्यांच्यासाठी खर्ची घातली. वनस्पतीशास्त्र - विश…
काळोखातील अग्निशिखा : कादंबिनी,रखमाबाई आणि हैमबती तेजस्विनी देसाई १४ जुलै २०२१
जवळ जवळ दीड शतकापूर्वीच काळ. अनिष्ट रुढी परंपरांमध्ये जखडलेला आणि अंधारात चाचपडणारा समाज. स्त्रियांची स्थिती तर आणखीनच हलाखीची.शिक्षण नाही, घरातील कर्त्या पुरुषाच्या मर्जीवर चालणारं कठपुतळीसारखं जीवन. ज्ञानप्रकाशच काय नैसर्गिक सूर्यप्रकाश देखील काही जणींना अप्राप्य!  या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. विद्येच्या प्रांगणात मुलींचे पहिले पाऊल पडले…
विज्ञानातील भारतीय तारका तेजस्विनी देसाई २४ जून २०२१
अलीकडेच एका मैत्रिणीशी विज्ञान - तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांविषयी चर्चा करत होते. अचानक ती म्हणाली, "भारतात कुठे अशा वैज्ञानिक आहेत? आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या तर अगदीच  कमी." तिच्या या प्रश्नावर मी अवाक झाले. कारण भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हटलं की, इरावती कर्वे, कमला सोहोनी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यापुढे आपली यादी सरकत नाही. शांतीस्वरूप …