पाऊस मेरसे रोदोरेदा ०३ मे २०२२
घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं ब…
कमळातल्या गोष्टी दीप्ती देवेंद्र २६ मार्च २०२२
कमळाची रोपं अंगणात लावण्याचं स्वप्न अनेक वर्षांपासून होतं तिचं. मातीविटांनी लिंपलेलं छोटंसं तळं अंगणात असावं. त्यात कमळं फुलावीत. त्यावर फुलपाखरं, मधमाशा गुणगुणाव्यात. छोटे रंगीत पक्षी भिरभिरावेत आणि आपण तासनतास ते पाहत बसावं, असं साधं गोजिरं तिचं स्वप्न. घरात तर जागेअभावी हे स्वप्न शक्य नव्हतं. मग, तिने तिच्या पॉटरी स्टुडिओच्या अंगणात एक प्लास्टिकचा टब ठेवला. आणि अखेर कुठून तरी कमळाच्या बिया …
संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट ज्ञानेश्वर जाधवर १५ मार्च २०२२
या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून …
‘अविनाशपासष्टी’ बाळासाहेब लबडे १५ मार्च २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा ६५ निवडक गझलांचा संग्रह त्यांच्या पासष्टीतील पदार्पणाचे औचित्य साधून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. इ.स.१९७९पासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून प्राचार्य डॉ. सांगोलेकर हे गझललेखन कर…
माणूस असण्याच्या नोंदी : वास्तवावर सखोल भाष्य सतीश कोंडू खरात ०३ मार्च २०२२
नव्या दमानं प्रवासाला निघालेल्या वाटसरूला मध्येच थांबता येत नाही. मजल दरमजल प्रवास करून, आकाशाला मिठी मारण्याचं स्वप्न पाहावं लागतं. हा सोस नक्कीच सोपा नाही. जेव्हा या सोसण्याचा कडेलोट होतो, तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. मग त्यातून स्फुल्लिंगाप्रमाणे कविता धुमसू लागतात. अशा कविता माणसाला स्फूर्ती देतात, स्वाभिमान जागवतात आणि अन्यायाचा प्रतिकार करतात. माणसाच्या हक्कासाठी लढताना माणसामाणसांतील भेदभाव …
काळाचा हिशोब मागणारी कविता देविदास सौदागर २४ फेब्रुवारी २०२२
कवी जितेंद्र अहिरे यांची कविता आजच्या वर्तमानाची भाषा बोलते. समकाल टिपताना कवी बैचेन होऊन जातो. लोकशाहीची गळचेपी होत असताना, 'आम्ही हिशोब घेऊ', असा आवाज तो उठवतो, तेव्हा तो सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटत राहतो. आजची बिघडलेली परिस्थिती आणि ती परिस्थिती लादणारे यांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे; पण भाकरीच्या मागे पळण्याची हतबलता आडवी येते आहे. नैसर्गिक जगण्याच्या चिंधड्या उडवून माणसांना…
‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस उत्पल व. बा. ११ फेब्रुवारी २०२२
‘मिळून सार्‍याजणी’च्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण ‘मिळून सार्‍याजणी’शी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या ‘पुरुष उवाच’ गटाच्या बैठका कारण ठरल्या. ‘मागे वळून बघण्या’इतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे ‘मिळून सार्‍याजणी’ हा म…
Our Souls at Night अमृता शेडगे २६ ऑक्टोबर २०२१
"माझ्या घरी रात्री झोपायला यायला तुला आवडेल का? It’s not about sex. मला एकटं वाटतं. तुलाही वाटत असेल कदाचित. It's about getting through the night you know. Nights are the worst. मला फक्त कोणीतरी सोबत हवंय. बोलायला, बोलत बोलत झोपायला". सत्तरीच्या जवळपास पोहोचलेली अ‍ॅडी तिच्याच वयाचा तिचा शेजारी ल्युईसशी बोलत होती. दोघे वर्षानुवर्षे शेजारी, पण कधी बोलणे नाही. दोघांचे जोडीदार आता या जगात नाहीत, मुले…
द कॉल ऑफ लाइफ नट हॅमसन २७ ऑगस्ट २०२१
कोपनहेगनच्या बंदराच्या आतील बाजूस असलेल्या मैदानाजवळ व्हेस्टरव्होल्ड नावाचा तुलनेने नवा असलेला रस्ता होता. मात्र तो तसा एकाकी होता. त्या रस्त्यावर थोडीच घरे होती व थोडेच गॅसचे दिवे होते. रस्त्यावर कोणीच माणसे सहसा दिसत नसत. सध्या अगदी उन्हाळ्यातही त्या रस्त्यावर रहदारी तुरळकच होती. काल संध्याकाळी एक आश्चर्यकारक गोष्ट त्या रस्त्यावर घडली. मी रस्त्याच्या बाजूने इकडे तिकडे फेऱ्या मारीत असताना व…