वंचितांच्या शिक्षणाचे आव्हान पेलणारी ’प्रयोगभूमी’ राजाराम कुंभार ०९ मार्च २०२३

या घटनेला वीसेक वर्षं झाली असतील. श्रीरामपूर येथील बी.एड्‍ कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, आणि त्यावेळच्या ’उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण’ या पेपर क्रमांक एक मधील दुसरा शैक्षणिक समाजशास्त्राचा विभाग माझ्याकडे अध्यापनासाठी होता. त्यात ’वंचितांचे शिक्षण’ या अंतर्गत आदिवासींचे शिक्षण हा एक घटक होता. एके दिवशी मी तो शिकवला. त्यानंतर दुपारच्या सुट्टीत एक प्रशिक्षणार्थी माझ्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला,…