“बाई, भाजी घेताय का?” मी म्हटलं, “थांब. मी पांच मिनिटांत येते. एक महत्वाचा फोन आहे.” तर ती मला म्हणाली, “बाई तुमच्याबरोबर बोलाक थांबलू, तर माझी भाजी खपाची नाय. काल माका भाजी अशीच घराक परतून न्हेवची लागलू.” मी म्हटलं, तुझ्याशी मला बोलायचं आहे. तर म्हणाली, “माका बोलाक येळ नाय. आम्ही अशी भाजी नाय तर मासे विकतलू, तेव्हा आमचा घर चलतलू. उद्या मी मासे घेवण येतू, मासे खपल्यावर मी बोलतलू.” दुसऱ्या दिवश…
खेड्यापाड्यातल्या साध्या आयुष्यातही अनेक मोठ्या कथा दडलेल्या असतात. त्या फारशा कुणाच्या नजरेत येत नाहीत, पण त्या जगण्याच्या ताकदीची जाणीव करून देतात. एका साध्या स्त्रीच्या आयुष्याकडे पाहताना मैत्री, प्रश्न, वेदना आणि माणुसकीचा स्पर्श या सगळ्यांचा एक वेगळाच संवाद घडतो. अशीच एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून उलगडणारी ही कथा आहे. हा लेख म्हणजे श्वेताने तिची मैत्रीण अंजलीला लिहिलेल…