पाऊस मेरसे रोदोरेदा ०३ मे २०२२

घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं ब…