उपेक्षितांची अन्नपूर्णा : उज्ज्वला बागवाडे मेघना अभ्यंकर ०८ ऑक्टोबर २०२१

सध्या टीव्हीवर ’आई कुठे काय करते’ ही मालिका चालू आहे त्यात आपल्या मुलाबाळांमध्ये, सासू-सासरा, नवरा, संसार यात रमलेल्या स्त्रीची वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठीची धडपड दाखवलेली आहे. मालिकेतील अशी लग्न झाल्यापासून आपली मुलं, परिवार, नातेसंबंध, नवरा यांच्यात गुंतून पडलेली आई, या ना त्या फरकाने आपण प्रत्येकाने आपल्या घरात पाहिली आहे. आपल्या आईने तिच्या आधी आपली काळजी करावी, आपल्…

फिरत्या चाकावरची जादूगार - चतुरा कुंभार मेघना अभ्यंकर ०७ ऑक्टोबर २०२१

“अनंत आमुची ध्येयासक्ती, अन् अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला...” कधीकाळी भाषणात म्हणलं होतं हे वाक्य... तेव्हा त्याचा अर्थ नीटसा कळला नव्हता. भाषणात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ओवी, उक्त्या, म्हणी, कवितांच्या ओळींपैकी हे एक वाक्य इतकचं; पण आज इतक्या वर्षांनी प्रकर्षाने ते वाक्य पुन्हा आठवावं आणि त्या वाक्याची प्रचिती यावी याला कारण ठरली मला भेटलेली - चतुरा कुंभार! सातारा शहरात कुरणेश्वर परि…

निर्वासितांची माउली : मंगेशी मून मेघना अभ्यंकर ०९ ऑक्टोबर २०२१

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, आपल्याला भीक मागणारी मुलं दिसतात. त्यांचे दिनवाणे चेहरे, खपाटीला गेलेली पोटं, मळके कपडे आणि चेहऱ्यावरच्या त्या अगतिकतेला पाहून सहजच आपला हात खिशात जातो, बोटं नाणी चाचपडत एक-दोन रुपयांच्या नाण्यांच्या शोध घेतात, खिशातला हात बाहेर येतो आणि समोरच्या त्या भीक मागणाऱ्या पोराच्या चेहऱ्यावर आशेची लकेर दिसते... एक-दोन रुपये तरी पदरात पडले या आनंदात तो त्याचा डबा वाजवत तिथून …

जागृतीचा वसा घेतलेली प्रियांका मेघना अभ्यंकर १० ऑक्टोबर २०२१

आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री कधी ना कधीतरी लैंगिक अत्याचार, विनयभंग, छेडाछेडी, अश्लील टोमणे यांचा अनुभव घेतेच. आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाविरूद्ध तिने कधी आवाज उठवू पाहिला, तर समाजात तिला डोळे मोठ्ठे करून गप्प केलं जातं. अनेकदा लैंगिक अत्याचार करणारे त्या मुलीचे नातेवाईकच असतात...कधी लाजेपोटी, कधी भीड बाळगून तर कधी मान-सन्मानाच्या फालतू कल्पना उराशी बाळगून मुलीचे आई-वडीलच तिला “विसरून जा, …