एक भाकर, तीन चुली
प्रा. कुसुम कुलकर्णी
१२ फेब्रुवारी २०२६
मुखपृष्ठापासून अर्पण पत्रिकेचेही कौतुक करावे असे हे पुस्तक. मी वाचनवेडी, मराठी प्राध्यापिका व सत्तर वर्षापूर्वी गारगोटीसारखे खेडेगाव अनुभवणारी म्हणून कादंबरीतील संघर्ष करणारी, परखड झाली, अवहेलना आली तरीही त्याला न हारता, न डगमगता लढत राहिले की 'पारू' आजही खेड्यापाड्यातील वाईट चालीरीती, जाचक रूढी परंपरांनी लाखो लेकी बाळींचं गुरासारखं जीवन जगणं, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी पारूचा संघर्ष. …