पन्नास वर्षांनंतर रंगमंचावर पुन्हा एकदा महापूर... डॉ. सुनीला गोंधळेकर २५ ऑगस्ट २०२५

पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि रंगभूमीवर गाजलेलं सतीश आळेकरांचं महापूर हे नाटक आजच्या काळात पुन्हा साकारलं जातंय, ही केवळ रंगमंचीय घटना नाही तर पिढ्यांच्या भावविश्वाला जोडणारा एक महत्त्वाचा सेतू आहे. 1975 मधल्या सामाजिक, मानसिक आणि नातेसंबंधांच्या संदर्भातले प्रश्न आजही नव्या रूपानं आपल्याला भिडतात, हे या नाटकाचं वैशिष्ट्य. आळेकर यांनी महानिर्वाण (1973), बेगम बर्वे (1979) यांसारख्या नाटकांमधून …