.png)
पुरुष उवाच विरुद्ध मिळून साऱ्याजणी: युरोपियन इतिहासातील एक लढाई
डॉ. चंद्रशेखर फणसळकर
१६ सप्टेंबर २०२५
एकोणिसाव्या शतकातील एक ख्यातनाम ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा समर्थक जॉन स्टुअर्ट मिल यानं त्याच्या ‘द सब्जेक्शन ऑफ वुमन’ या स्त्रीवादी दीर्घ निबंधामध्ये लिहिलं आहे - ‘स्त्री’ ‘खरोखर’ काय आहे हे सहजपणे कळणं शक्य नाही, कारण ज्या समाजात स्त्रियांवर पुरुष वर्चस्वाचा प्रभाव नव्हता असा समाज आजपर्यंत कधीच अस्तित्वात नव्हता. अर्थात या मानवरचित समाजरचनेत स्त्रीचं खरं रूप ज्याप्रमाणे मोड…