ब्रिटिशकालीन भारतीय रेल्वे मार्ग आणि वडार मजूर जगन्नाथ सावंत ०९ ऑगस्ट २०२१

भारतात अतिशय कठिण शारीरिक श्रम करणारा समाज म्हणजे वडार अशी त्यांची ओळख आहे. दगड खाणी शोधणे व खणणे, दगड व खडी फोडणे, रस्ते तयार करणे, तलाव व विहिरी खोदणे, बंधारे बांधणे, दगडांची कोरीव कामे व इमारत बांधकामे अशी परंपरागत कामे वडार समाज पूर्वीपासून करत आहे. ब्रिटिशकालीन भारतातील सरकारी इमारती, पाटबंधारे, तलाव, धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग व पूल निर्माण करण्यात वडार मजुरांचे मुख्य श्रेय आहे. ब्रिटिशकालीन स…