पर्यावरण संतुलन : खरं आव्हान बाजारपेठेचं आहे! अतुल देऊळगावकर १५ जून २०२०

कोरोना आणि जागतिक हवामान बदल या दोन्ही गोष्टी निसर्ग विनाशाच्या उत्पत्ती आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. दोन्हीच्या मुळाशी 'निसर्गाचा विनाश' हेच कारण आहे. हवामानबदलाचं कारण कार्बन उत्सर्जनात वाढ झाल्याने होणारी प्रदूषण वाढ हे आहे, पण प्रदूषणामुळे निसर्गावर विपरीत परिणाम आणि त्यातून तापमानवाढ अशी मूळ साखळी आहे. कोरोनाबाबत सध्या जगातले जे संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत ते काय सांगतायत? जंगलविनाश वेगात सुरू…