माणूस असण्याच्या नोंदी : वास्तवावर सखोल भाष्य सतीश कोंडू खरात ०३ मार्च २०२२

नव्या दमानं प्रवासाला निघालेल्या वाटसरूला मध्येच थांबता येत नाही. मजल दरमजल प्रवास करून, आकाशाला मिठी मारण्याचं स्वप्न पाहावं लागतं. हा सोस नक्कीच सोपा नाही. जेव्हा या सोसण्याचा कडेलोट होतो, तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. मग त्यातून स्फुल्लिंगाप्रमाणे कविता धुमसू लागतात. अशा कविता माणसाला स्फूर्ती देतात, स्वाभिमान जागवतात आणि अन्यायाचा प्रतिकार करतात. माणसाच्या हक्कासाठी लढताना माणसामाणसांतील भेदभाव …