अ‍ॅन फ्रँक आणि समांतर वेदनेच्या कहाण्या माधवी वागेश्वरी १० सप्टेंबर २०२०

लाल पांढर्‍या चौकटीची एक छोटी डायरी ही विसाव्या शतकातील एक ऐतिहासीक दस्तावेज बनली. सगळ्याच गोष्टींचं ‘रेकॉर्ड’ ठेवणार्‍या जर्मनीत मानवी इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत क्रूर वंशहत्येचा दस्तावेज लिहिला गेला, ज्यात सलग १२ वर्षं २२ देशातील ज्यू नष्ट करण्यासाठी रीतसर यंत्रणा उभी केली गेली. यातील चार वर्षं त्यांना मारून टाकण्यात आलं. त्यात ही डायरी मानवी आशावाद, चांगुलपणा आणि करुणा यांचं …