कोल्हाळ - असह्य कोंडमारा डॉ. सुधाकर ठाकूर १२ फेब्रुवारी २०२६

सामान्य गरीब अशिक्षित माणसे समाजामध्ये सतत शोषली जात असतात. आपण शोषले जात आहोत याची बिचाऱ्यांना कल्पनाच नसते. यांच्या शोषणावर एक माजोर व्यवस्था उभी राहते. ती कसलीच भीडभाड बाळगत नाही. शोषक हेच आपले खरे तारणहार आहेत अशीच या भोळ्याभाबड्या अशिक्षित माणसांची धारणा असते. हे झाले अशिक्षित माणसांच्या बाबतीत. परंतु सुजाण सुशिक्षित माणसांच्या शोषणाचीही एक समांतर व्यवस्था कार्यरत असतेच. आपण शोषले जात आहोत ह…