निर्भेळ वाचनानंद देणारी स्मरणयात्रा!
डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर
१२ फेब्रुवारी २०२६
उंच गिरीशिखरांच्या चढाईनंतर आपली दृष्टी वळते ती पायथ्याच्या दिशेला... खालचा आरंभीचा परिसर न्याहाळणे ही सहजच घडणारी क्रिया! आयुष्याच्या प्रवासातही एका विशिष्ट टप्प्यावर थबकून आतापावेतो केलेली मार्गक्रमणा, त्यातले चढउतार, खाचखळगे आणि कडू-गोड आठवणींची उजळणी शब्दांत उतरविणे - हा असाच एक स्वानंदी अध्याय, डॉ. अच्युत वन लिखित 'माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा' हा आत्मपर ग्रंथ अशाच स्वयंप्रेरित, स्वानंदी जातक…