अस्तित्व राम मधुघन २१ जून २०२२

मी तेव्हा पुण्यात राहात कर्वेनगरात होतो. ऑफिस वारजे येथील रुणवाल सोसायटीत होते. तिथून वारजे पुलाजवळ उतरून, मी बहुतेकदा पायीच चालत कर्वेनगरमधील स्पेन्सर्स चौकात जायचो. २०१५ चा ऑक्टोबर महिना असावा, नेहमी प्रमाणे काम आटोपून मी ऑफिसातून निघालो. भूक लागली होती म्हणून काहीतरी खाण्याच्या शोधात मी थोडा पुढील बाजूस गेलो, तिथे कच्छी दाबेलीची गाडी लागलेली असायचीच. मी एक दाबेली ऑर्डर करून उगाच इकडेतिकडे न्याह…