कमळातल्या गोष्टी दीप्ती देवेंद्र २६ मार्च २०२२

कमळाची रोपं अंगणात लावण्याचं स्वप्न अनेक वर्षांपासून होतं तिचं. मातीविटांनी लिंपलेलं छोटंसं तळं अंगणात असावं. त्यात कमळं फुलावीत. त्यावर फुलपाखरं, मधमाशा गुणगुणाव्यात. छोटे रंगीत पक्षी भिरभिरावेत आणि आपण तासनतास ते पाहत बसावं, असं साधं गोजिरं तिचं स्वप्न. घरात तर जागेअभावी हे स्वप्न शक्य नव्हतं. मग, तिने तिच्या पॉटरी स्टुडिओच्या अंगणात एक प्लास्टिकचा टब ठेवला. आणि अखेर कुठून तरी कमळाच्या बिया …