संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट ज्ञानेश्वर जाधवर १५ मार्च २०२२

या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून …