No Watery Eyes Challenge गंधार पारखी १५ मे २०२३

साल २००१. आजही तिचा थिसिस नाकारला गेला. तिच्या स्वीडिश प्रोफेसरने सांगितलेल्या सगळ्या करेक्शन्स करूनही. सहा महिन्यांपूर्वीही असाच नाकारला गेला होता. रूमवर येताना युनिव्हर्सिटीचे बर्फाळ रस्ते आपल्याला गडद काळोख्या बोगद्यात घेऊन जातायत, असं तिला वाटत होतं. रूमवर पोचली तेव्हा तिची जर्मन रूममेट आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बाहेर गेली होती. तिला एकटीला रूमवर राहायची भीती वाटत होती. चार वर…