‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस उत्पल व. बा. ११ फेब्रुवारी २०२२

‘मिळून सार्‍याजणी’च्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण ‘मिळून सार्‍याजणी’शी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या ‘पुरुष उवाच’ गटाच्या बैठका कारण ठरल्या. ‘मागे वळून बघण्या’इतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे ‘मिळून सार्‍याजणी’ हा म…